एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात उसळी !

Foto


मुंबई:  लोकसभा निवडणुकासाठी काल सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतली. पहिल्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स८०२  अंकांनी वाढला असून निफ्टीतही २२९ अंकांची वाढ झाली आहे. सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली. शेअर बाजारात ८०२  अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स ३८,८१९.६८ अंकांवर उघडला. तर निफ्टीतही २२९ अंकांची वाढ होऊन११,६९१.३० अंकांवर उघडला.  

रिटेल रिसर्टचे प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलने जास्तकरुन भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातही असा अंदाज दिसत होता. जर भाजपाने स्वबळावर बहुमत मिळविले, तर शेअर बाजारात आणखी उसळी येईल. दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना माहीत आहे की, बर्‍याचदा एक्झिट पोल चुकीचे ठरु शकतात. त्यामुळे शेअर बाजार एक मजबूत सरकार पाहते. मात्र, निकाल लागेपर्यंत म्हणजेच २३ मेपर्यंत लोकांनी वाट पाहिली पाहिजे, असेही दीपक जसानी म्हणाले.  

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker